Gajkumar Doshi

प्रिय लायन मित्रांनो, नमस्कार

अध्यक्षपदाची कारकीर्द 16-17 आता संपत आली. आपल्या हातात जेव्हा सारस विक्रम अध्यक्ष म्हणून ला. चंद्रकांत चमाडिया हे वर्ष 17-18 ला अरूढ होतील.

आपला क्लब प्रशासन आणि सेवा कार्यात डिस्ट्रीक्टमधून तिमाही प्रशासनामधे 3 वेळा पहिला वसेवा कार्यामधे पहिला व दुसरा आला. आपला क्लब सेवा कार्यात विशेषता लायन क्विस्ट,अक्षयपात्रा, कुपोषित मुलांसाठी पौष्टीक आहार, इंटर नॅशनल टुर्नामेंट क्रिकेट फॉर ब्लार्इंड,अनाजदान, ट्राफीक अवेरनेस यामध्ये आपला क्लब आतंरराष्ट्रीय पातळी पर्यंत पोहोचलाआणि शतक महोत्सवामधे एक वेगळा विक्रम केला. आपल्या क्लबला व अध्यक्षांना अनेकपारितोषके व सन्मानपत्रे मिळाली ही आपल्या सेवा कार्याची पोच पावतीच आहे.

सचिव ला. भैरवी मेहता, खजिनदार ला. जुगराज सोलंकी, ला. वीरमती दोशी यांचे योगदान, सहकार्य विशेष लाभले याचे वर्णन करता येत नाही. आपल्या क्लबमधील सर्व सदस्य यांचे सहकार्य व मार्गदर्शन वेळोवेळी मिळाले तसेच प्रांतपाल चंद्रहास शेट्टी, सर्व माजी प्रांतपाल, उपप्रांतपाल, कॅबिनेट ऑफिसर आणि सर्व सदस्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

अध्यक्ष या वाक्यात एक वेगळा रिस्पेक्ट होता, आपल्या क्लबची उर्जा, मार्गदर्शन गुरू ला.रांकाजी ङ्गबोला प्रेसिडेंट...असे उच्चारायचे तसेच क्लबचे सदस्य सुध्दा म्हणावयाचे. यापुढेअसे ऐकावयास मिळणार नाही...

अध्यक्षपदाची कारकिर्द संपताना खूप समाधान आहे. आपल्या कारकिर्दीत आपल्या क्लबचे नाव एका उच्च शिखरावर गेले याचे मानसिक समाधान आहे. समाजासाठी व गोरगरिबांसाठी आपण काहीतरी सेवा करू शकलो याचा आनंद मोजता येत नाही.

भावी पदाधिकारी व त्यांच्या टिमला सेवाकार्यासाठी हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद आपला ला. गजकुमार दोशी प्रसीडेंट-2016-17


Featured Posts